चंद्रपूर येथील एका घरात सुरू होता कुंटणखाना; LCB चा छापा, दोन पीडित महिलांची सुटका

0
चंद्रपूर येथील एका घरात सुरू होता कुंटणखाना; LCB चा छापा, दोन पीडित महिलांची सुटका




चंद्रपूर :  येथे अष्टभुजा वॉर्डातील लव्ह इंडिया चर्चच्या मागे राहत्या घरात महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने  धडक कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली बनावट ग्राहक पाठवून कारवाई करण्यात आली. महिला पंच, सोशल वर्कर तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या कारवाईत मुस्कान शफीक शेख (४०) आणि रेशमा उर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख (४५) या दोघी वेश्याव्यवसाय चालविण्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी कारवाईदरम्यान मोबाईल फोन, रोख रक्कम आणि कंडोमचा बॉक्स असा एकूण १२२,२४० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५व७अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या सहकार्याने पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !