श्री सद्गुरु साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन
वैनगंगा वार्ता १९
आष्टी : श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन व अग्निसुरक्षा विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. के. सिंग तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती सोनाली बागडे, व्यवस्थापक, सूर्या गॅस सेफ्टी उपकरण कंपनी, श्री. संजय बागडे, श्री निलेश सरजारे तसेच आयोजक प्रा. महेशकुमार सिलमवार विद्यार्थी विकास अधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी श्रीमती सोनाली बागडे यांनी गॅस सिलिंडरचा सुरक्षित वापर, गॅस गळती झाल्यास घ्यावयाची खबरदारी, गॅस शेगडीची काळजी, आग लागल्यास करावयाच्या प्राथमिक उपाययोजना तसेच अग्निशामक यंत्राचा योग्य वापर याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वृंद डॉ. अपर्णा मारगोनवार, डॉ. एम. पी. सिंग, डॉ प्रदीप कश्यप, डॉ. दिपक नागापुरे, प्रा. सुबोध साखरे, प्रा.सचिन मुरकुटे, प्रा. जया रोकडे, प्रा.कविंद्र साखरे, प्रा. रवींद्र भुरसे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी रविंद्र झाडे, सविता गारगाटे, अविनाश जिवतोडे, विजय खोब्रागडे, शुभांगी डोंगरे, रमेश वागदरकर, पौर्णिमा गोहणे, नितु शेंडे आदी सहकार्य केले.

