समुह साधन केंद्र गणपूर येथे तिसरी शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात साजरी
वैनगंगा वार्ता १९
आष्टी,(अशोक खंडारे):-
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुधोली चक नं 2 समूह साधन केंद्र गणपुर (रे) येथे तिसरी शिक्षण परिषदचे आयोजन करण्यात आले होते, सदर शिक्षण परिषदेला अध्यक्ष म्हूणन राजेश्वर कुळमेथे अध्यक्ष शा व्य.समिती मुधोली चक नं 2 तर उद्घाटक म्हणुन गुरुदेव मेश्राम उपाध्यक्ष शा व्य. मुधोली चक नं 2 तर आयोजक म्हणून श्री कपिल सहारे केंद्रप्रमुख गणपुर (रे) उपस्थित होते. सदर शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात पार पडली.या शिक्षण परिषदेत शिक्षकांना विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाने झाली.
त्यानंतर आनापान साधना, निपुण भारत अभियान,PGI व UDISE + डेटा भरणे, तसेच शालेय व्यवस्थापन समिती (SMC) सक्षमीकरण व गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांवर चर्चा झाली.परिषदेदरम्यान शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवून अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी उपयुक्त माहिती आत्मसात केली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांबाबत मार्गदर्शन मिळाले.
अखेरीस समारोप सत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संदेश देण्यात आला. या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या ज्ञानात भर पडून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास निश्चितच मदत होईल असे मत गणपुर केंद्राचे केंद्रप्रमुख कपिल सहारे यांनी व्यक्त केले. संचालन राकेश वनकर मुख्याध्यापक मुधोली चक नं 2 तर आभार प्रदर्शन संजय नागुलवार सर यांनी केले.

