मुसरमगुडा येथील रस्त्याची चाळण ! नागरिकांच्या जीवाशी चालविला खेळ! गेल्या २४ वर्षांपासून डांबरीकरणच केला नाही

0


मुसरमगुडा येथील रस्त्याची चाळण ! नागरिकांच्या जीवाशी चालविला खेळ! गेल्या २४ वर्षांपासून डांबरीकरणच केला नाही


गडचिरोली | एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील मौजा मुसरमगुडा येथील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
24 वर्षांपासून एकच रस्ता

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार सन 2002 मध्ये म्हणजेच तब्बल 24 वर्षांपूर्वी सदर रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत या रस्त्याची कोणतीही दर्जेदार दुरुस्ती किंवा डांबरीकरण करण्यात आलेले नाही.

सद्यस्थितीत रस्त्याची पूर्णपणे वाट लागली असून डांबर पूर्णपणे नाहीसे झाले आहे. सर्व गिट्टी व खडी उखडून रस्त्यावर पसरली आहे.

अपघात नित्याचेच, विद्यार्थी-वृद्ध हैराण

या उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे वाहने घसरत असून लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. पायी चालणेही वृद्ध आणि लहान शाळकरी मुलांसाठी जीवघेणे ठरत आहे. पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिकाही अडकून पडत आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष

ग्रामपंचायत, PWD विभागाला वारंवार तोंडी व लेखी निवेदने देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रशासनाने तात्काळ पाहणी करून नवीन रस्त्याचे काम तातडीने मंजूर करावे, अशी मागणी ग्रामसभा अध्यक्ष रसीनाथ गावडे तथा मुसरमगुडा येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !