गडचिरोली जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष - रिपब्लिकन पक्षाच्या सभेत कार्यकर्त्यांचा संताप

0
गडचिरोली जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष -
 रिपब्लिकन पक्षाच्या सभेत कार्यकर्त्यांचा संताप


गडचिरोलीः(अशोक खंडारे ) :- जिल्ह्यातील नागरिकांना अनेक ज्वलंत समस्यांचा सामना करावा लागत असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही या समस्यांची सोडवणूक न होणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचा आरोप अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाने केला असून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
   सोमवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सभा चांदेकर भवन येथे संपन्न झाली. त्या सभेत जनसमस्यांची सविस्तर चर्चा होऊन शासन- प्रशासनाने या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
   रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिवारवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई बारसागडे, विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
   महिला -बाल रूग्णालयात झालेल्या माता-बालकांचे मृत्यू, चांगल्या रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने जपतलाई आश्रमशाळेतील तीन मुलींचा झालेला मृत्यू, शेतकऱ्यांच्या जमिनीचे बळजबरी भुसंपादन, कोठी-कोरनार पूल कोसळून सुध्दा अद्याप कारवाई न होणे, महामंडळाच्या बसेस अभावी विद्यार्थी व प्रवाशांची होणारी गैरसोय, शेतकऱ्यांचे  बोनस, ग्रामीण भागातील पांदण रस्त्याचे खडीकरण, रानटी हत्ती व वाघांचा हैदोस आणि गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरूस्ती व स्वच्छतेचा अभाव, अशा अनेक समस्यांवर सभेत चर्चा करण्यात आली व या समस्यांसाठी लवकरच आंदोलन उभारण्याचे ठरविण्यात आले.
   या सभेत विठोबाजी साखरे, लालबहादूर मशाखेत्री, प्रा. टिकाराम धाकडे, मधूकर टेंभुर्णे यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. त्यांचे पुष्प व सभासद पावती देवून स्वागत करण्यात आले.
सभेचे संचालन प्रा. राजन बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रल्हाद रायपुरे यांनी केले. सभेला जिल्हाभरातील कार्यकर्ते प्रेमेद्र सहारे, सिध्दार्थ खोब्रागडे, पुंजाराम जांभूळकर, दादाजी धाकडे, सुनिता रायपुरे, उध्दव नारनवरे, विजय देवतळे, भरत जांभूळकर, निरंजन उमरे, कल्पना रामटेके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !