सामदा (बु) येथे म्हशी चारायला जंगलात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने पाडला फडशा

0
सामदा (बु) येथे म्हशी चारायला जंगलात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने पाडला फडशा 


सामदा (बुज) :-  सावली तालुक्यातील सामदा बुज येथे काल दि . २१ सप्टेंबरला सायंकाळी एक हृदयद्रावक आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे.  सामदा (बु) रहिवासी हेमंत अशोक भुरसे हे नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गावा शेजारच्या जंगलात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात हेमंत भुरसे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत हे दुपारच्या सुमारास जंगलाच्या आत गेले होते. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. जंगलात शोध घेतला असता त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच संपूर्ण सामदा बुज गावावर शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर सामदा बुज आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाघाचा वावर वाढला असून वनविभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

"रोज पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात जावं लागतं, पण जीव मुठीत धरून जावं लागतंय" . आज हेमंत गेला, उद्या आमचा नंबर लागणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

या घटनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कोणीही जंगलाच्या वाटेला जाण्यास तयार नाही.
मागण्या जोर धरू लागल्या :
1. नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा किंवा स्थलांतरित करा.
2. मृतक हेमंत भुरसे यांच्या कुटुंबाला तात्काळ 25 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
3. गावाच्या सीमेवर कायमस्वरूपी वनरक्षकांची गस्त आणि ट्रॅप कॅमेरे लावावेत.

घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी आणि सावली पोलिस दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
सावली तालुका वाघांच्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला असून वनविभाग आता तरी जागे होणार का? असा प्रश्न सर्वच नागरिकांकडून 
 उपस्थित होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !