ज्ञानाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक विकासासाठी महाविद्यालयीन जीवन दिशादर्शक - प्राचार्य किशोर पाचभाई यांचे प्रतिपादन
आष्टी: (गडचिरोली):- महाविद्यालयीन जीवन हे खरे तर मंतरलेले आणि जीवनाला योग्य आकार देणारे असतात विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकरिता महाविद्यालयात जो प्रवेश घेतला आहे या महाविद्यालयातून ज्ञानाबरोबरच कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक करून आपले जीवन सार्थकी लावावे असे प्रतिपादन मार्गदर्शक प्राचार्य किशोर पाच भाई यांनी केले ते वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाच्या स्वागत समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ३ सप्टेंबर २०२६ रोजी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मुसणे होते. मुख्य अतिथी
महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, आष्टीचे
प्राचार्य किशोर पाचभाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्योती बोबाटे यांच्यासह, प्रा. डॉ. संजय फुलझेले, प्रा. भारत पांडे, प्रा. डॉ. रवी शास्त्रकार, प्रा. डॉ. गणेश खुणे, प्रा. डॉ. श्याम कोरडे, प्रा. रवी गजभिये तसेच समस्त शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य किशोर पाचभाई यांनी महाविद्यालयीन जीवनातील संधींचा योग्य उपयोग करून शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी वाचन, चिंतन आणि विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या ज्ञानाचा विस्तार करावा, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. राजकुमार मुसने यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि चिकित्सक विचारसरणी अंगीकारून आपल्या उज्ज्वल भवितव्याची वाटचाल करावी, असे प्रतिपादन केले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्योती बोबाटे यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयातील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


