गडचिरोलीतील सुपीक शेतजमिनी वाचविण्यासाठी काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी – मल्लिकार्जुन खरगेजी
गडचिरोली::
गडचिरोली जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनींचे प्रस्तावित अधिग्रहण थांबवावे, या प्रमुख मागणीसाठी महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीतील शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगेजी यांची भेट घेतली.
यावेळी शेतकरी शिष्टमंडळाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत, तसेच या गंभीर प्रश्नावर राज्यसभेत आवाज उठवावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात खरगेजी यांना निवेदनही देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे आश्वासन मल्लिकार्जुन खरगेजी यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्षाचा लढा आजवर सुरू होता आणि भविष्यातही हा लढा सातत्याने सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या लढ्याला राष्ट्रीय स्तरावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होऊन पाठिंबा देतील, असेही त्यांनी सांगितले. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या या प्रमुख प्रश्नाला लोकसभेत तसेच राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडण्यात येईल व शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाचविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही खरगेजी यांनी शेतकरी शिष्टमंडळाला दिली.
यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळात मनोहर पा. पोरेटी, ऍड. दुष्यन्त नामदेव कीरसान, दिवाकर निसार , प्रमोद भगत, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, धिवरू मेश्राम, विकास जेंगठे, मारुती कांबळे, रवी बोदलकर, निकेश तुंकलवार, साईनाथ चलाख, सुनील कोहपरे, भक्तदास भगत, मनोज दहेलकर, गुरुदास ठुसे, वसंत बुर्णवार, तात्याजी चिचघरे, गुरुदास ठाकरे, विजय निकुरे, विजय लाड, नदीम नाथानी, विपुल एलटीवार सह शेतकरी उपस्थित होते.

