तीन विद्यार्थीनींच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकारी निलंबित

0
तीन विद्यार्थीनींच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकारी निलंबित



गडचिरोली :- धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने अखेर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य व मूलभूत सुविधांमधील गंभीर त्रुटींच्या तपासणीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) पी. पी. सादमवार आणि तत्कालीन प्रभारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. कन्नाके यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. नागपूरच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास आयुषी सिंह यांनी २१ ऑगस्ट रोजी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

चौकशीदरम्यान आश्रमशाळेतील शौचालये व स्नानगृहे अस्वच्छ व अपुरी असल्याचे, विद्यार्थिनींच्या वसतिगृह परिसरात कचरा व लाकूडफाटा पडून असल्याचे तसेच प्रथमोपचार पेटीचीही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले. विद्यार्थिनींच्या निवासव्यवस्थेतही त्रुटी आढळल्या होत्या. बोअरवेलच्या पाण्याचे योग्य शुद्धीकरण न करता वापर होत असल्याचेही निदर्शनास आले.

विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी आश्रमशाळेची पाहणी केली होती. मात्र, पाहणीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटींची योग्य नोंद करून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !