आष्टी येथे विविध उपक्रमांनी साजरा केला बबलूभैय्या हकीम यांचा वाढदिवस

0
आष्टी येथे विविध उपक्रमांनी साजरा केला बबलूभैय्या हकीम यांचा वाढदिवस


आष्टी:
वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने   संस्थेचे सचिव मा. अब्दुल जमीर हकीम उर्फ बबलूभैय्याजी यांच्या वाढदिवसानिमित्त  ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच परिसर स्वच्छता करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मुसणे ,राजीव गांधी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एम. शेख, आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार डी.डी.रॉय , प्रा.बी. के.राठोड, प्रा.डॉ.रवी शास्त्रकार, प्रा.रवी गजभिये,डॉ. संजय फुलझेले,डॉ.गणेश खुणे,  डॉ. ज्योती बोबाटे, डॉ . भारत पांडे,डॉ. श्याम कोरडे,  राज लखमापुरे,निलेश नाकाडे , इरफान शेख,मुस्ताक शेख,प्रभाकर भोयर,  दीपक खोब्रागडे, विनोद तोरे, समीक्ष शेख यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. सामाजिक, राजकीय , क्रीडा व सांस्कृतिक  उपक्रमात सक्रिय असलेले  नावलौकिक प्राप्त अशा संस्थेची धुरा सांभाळणाऱ्या बबलूभैय्याना दीर्घ आयुरारोग्य लाभो, अशी प्रार्थना करीत शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !