शिवाजी हायस्कूल गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान यश; शाळेची यशाची परंपरा कायम

0
शिवाजी हायस्कूल गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान यश; शाळेची यशाची परंपरा कायम!




​गडचिरोली(अशोक खंडारे):-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट बुद्धिमत्तेच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील  विद्यार्थ्यांनी अंतिम शिष्यवृत्ती पात्र यादीत आपले स्थान निश्चित करून शाळेच्या व जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

विद्यालयाचे प्रज्ञावान विद्यार्थी वंश विनोद वडुले आणि संवेग संतोष मोहुर्ले यांनी इयत्ता पाचवीच्या स्तरावर अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत गुणवत्तेचा उच्चांक गाठत शिष्यवृत्ती धारकांमध्ये आपले नाव नोंदवले.तसेच
इयत्ता आठवीच्या स्तरातून यथार्थ नवनाथ चिमुरकर याने आपल्या अष्टपैलू बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करत शिष्यवृत्ती पात्र यादीत मानाचे स्थान पटकावले. या विद्यार्थ्याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक  शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये सुद्धा शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला आहे. त्यामुळे याचे दुहेरी अभिनंदन होत आहे.

​विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिष्यवृत्ती परीक्षेत आपला दबदबा निर्माण करत उज्ज्वल यशाची ऐतिहासिक परंपरा अखंड ठेवली आहे.  विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते दैदीप्यमान यश संपादन करू शकतात, हे या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
​विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या ऐतिहासिक व भरघोष यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील मशाखेत्री, मंडळाचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. अरुण तेजराम मुनघाटे, उपमुख्याध्यापक श्री. डी. आर. चौधरी, पर्यवेक्षक श्री. एस. एस. चुधरी , श्री. आर. व्ही. जंगावार तसेच  मार्गदर्शक शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून
त्यांच्या पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी  हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !