चंद्रपूरच्या पालिकेवर भाजपच्या संगीता खांडेकर , दोघांच्या झगड्यात तिसऱ्याचा लाभ

0
 चंद्रपूरच्या पालिकेवर भाजपच्या संगीता खांडेकर , दोघांच्या झगड्यात तिसऱ्याचा लाभ


चंद्रपूर :-
 चंद्रपूर शहर महानगरपालिका महापौर व उपमहापौर निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होत, राजकारणातील कट्टर विरोधक शिवसेना ठाकरे व भाजपने हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केली. विशेष बाब म्हणजे भाजप पक्षातर्फे महापौर पदी संगीता खांडेकर या केवळ एकमताने जिंकल्या तर उपमहापौर प्रशांत दानव हे ईश्वर चिठ्ठीने निवडून आले.
चंद्रपूर मनपा निवडणुकीत ६६ जागेपैकी कांग्रेसने २७, भाजप २३, शिवसेना उबाठा ६, जनविकास सेना ३, अपक्ष २, वंचित आघाडी २, शिंदेसेना १, AIMIM १ व बसपाने एका जागेवर विजय मिळविला होता, सुरुवातीपासून कांग्रेस पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर विरुद्ध आमदार विजय वडेट्टीवार यांचा संघर्ष उफाळून आला. दोन्ही नेत्यांनी महापौर आपल्या गटाचा व्हावा असा हट्ट धरला, नगरसेवकांची पळवापळवी सुद्धा नेत्यांद्वारे करण्यात आली. कांग्रेस पक्ष अंतर्गत कुरघोडी करण्यात व्यस्त होता त्यामुळे आज कांग्रेसने हातची सत्ता गमावली. जनविकास सेनेनमधील ३ नगरसेवक हे कांग्रेसच्या समर्थनार्थ निवडून आलेले होते. त्यामुळे कांग्रेस हि ३० जागांवर पोहोचली, बहुमतासाठी त्यांना केवळ ४ नगरसेवकांची साथ हवी होती.
कुरघोडी व अंतर्गत राजकारणाच्या संघर्षात शिवसेना उबाठा किंगमेकर ठरला, महापौर निवडणुकीच्या १५ मिनिटांपूर्वी कांग्रेस सोबत उबाठा पक्षाची बैठक झाली, शिवसेना महापौर पदावर ठाम होता, मात्र त्यांच्या मागणीला कांग्रेस तर्फे खासदार धानोरकर यांनी विरोध दर्शविला, त्यामुळे बैठकीतून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे संताप व्यक्त करीत बाहेर निघाले भाजपाने  डाव साधत, सेनेपुढे सत्तेचा फॉर्म्युला ठेवला आणि शेवटच्या वेळी भाजप-शिवसेना उबाठा युती करीत महापौर निवडणुकीला सामोरे गेले. महापौर पदाच्या निवडणुकीत कांग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना ३१ मते तर भाजपच्या संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाली. वंचित आघाडीचे २ तर AIMIM चे १ नगरसेवक अनुपस्थित राहिले. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जनविकास सेना चे पप्पू देशमुख यांना ३२ तर अपक्ष निवडून आलेले कांग्रेस बंडखोर प्रशांत दानव यांना सुद्धा ३२ मते मिळाली. प्रशांत दानव यांनी आज सकाळी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला होता.
चंद्रपूर मनपा निवडणुकीनंतर शिवसेना उबाठा व वंचित आघाडीने ८ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली होती या गटाला २ कांग्रेस बंडखोर अपक्ष नगरसेवकांची साथ मिळाली. जनविकास सेनेने आपले ३ व AIMIM चा एक नगरसेवक असा ४ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली. मनपा निवडणुकीत जनविकास सेना व कांग्रेस एका प्रभागात एकत्र लढली व त्यामध्ये जनविकास सेनेचे ३ नगरसेवक निवडून आले होते. वंचित व शिवसेना उबाठा भाजपाला समर्थन देण्याच्या तयारीत नव्हते, यावर वंचित आघाडी व शिवसेना उबाठा ने विरोधात बसू पण भाजपला समर्थन देणार नाही अशी भूमिका वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली होती. मात्र स्थानिक पातळीवर शिवसेना पक्षाचे ६ व २ अपक्षांनी थेट भाजपला सत्तेसाठी साथ दिली.असा आहे सत्तेचा फॉर्म्युला

शिवसेना उबाठा ने कांग्रेस पक्षाकडे महापौर पदाची मागणी केली होती, पहिला महापौर आम्हाला देत असणार तर आमचा पाठिंबा तुम्हाला या अटीवर शिवसेना ठाम होती, भाजप पक्षाने पहिली सव्वा वर्षे भाजपचा तर पुढची सव्वा वर्षे शिवसेना उबाठा चा महापौर, उपमहापौर उबाठा ५ वर्षे, स्थायी समिती सभापती पहिलं आणि चौथे वर्ष शिवसेना उबाठा असा सत्तावाटपाचा फॉर्म्युला सेनेपुढे ठेवला, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी भाजपच्या फॉर्म्युला वर सहमती दर्शवली. कांग्रेस पक्षाने उबाठा ला अडीच वर्षे महापौर देऊ असे सांगितले होते मात्र याउलट भाजपचा सत्ता फॉर्म्युला शिवसेनेने मान्य केल्याने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला अशी चर्चाही जनमानसात रंगली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !