तिर्थक्षेत्र चपराळा ते आष्टी या खड्डेमय रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा - गडचिरोली शिवसेना (शिंदे)

0
तिर्थक्षेत्र चपराळा ते आष्टी या खड्डेमय रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा - गडचिरोली शिवसेना (शिंदे)


 शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
  
 आष्टी (प्रविण तिवाडे):-
गडचिरोली जिल्हयातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या चपराळा मार्गांवर आष्टी ते चपराळा दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांच्याकडे दिनांक 23 जानेवारी रोजी निवेदन देवून केली.

 प्रशांत धाम चपराळा हे प्रसिद्ध तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ आहे. येथे येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच महाशिवरात्री निमित्त येथे मोठी यात्रा भरते महाराष्ट्रासह शेजारच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश व छत्तीसगमधील भाविक मोठ्यासंख्येने येत असतात. मात्र चपराळा येथे जाण्यासाठी आष्टी ते चपराळा दरम्यानच्या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे या मार्गांवर अनेक अपघात झाले आहे. नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. मात्र या खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या खड्डेमय रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आविष्यांत पांडा यांच्याकडे निवेदन देवून केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, युवा सेना जिल्हाप्रमुख दिपक भारसाकडे, बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख असिद मिस्त्री,अविनाश वरगंटीवार,बंटी खडसे, राकेश बैस, शीतल बनसोड, श्रीदेवी वरगंटीवार, नीलकंठ येरमे, कपिल पाल, संतोष बत्तुलवार आदी उपस्थित होते
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !