सात फेब्रुवारीला गेट परीक्षा असल्याने राज्यातील त्या दिवशी होणारे पेपर रद्द करण्यात यावे -- प्रा. डॉ. भारत पांडे
गडचिरोली:- (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९)
ग्रॅज्युएट ऑप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) ही अभियांत्रिकी आणि विज्ञानातील पदवीत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळून देणारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये नोकरी मिळवण्यासाठी(IITS व IISC) आयआयएससी द्वारे संयुक्तपणे आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन पात्रता परीक्षा 07/02/2026 रोज शनिवार ला असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी त्याच दिवशी वेळापत्रकानुसार होणारे पेपर रद्द करावे अशी मागणी प्रा.डॉ. भारत पांडे ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यानी प्रसिद्धी पत्राद्वारे केलेली आहे.
दिनांक 07/02/ 2026 रोज शनिवारला अभियांत्रिकी स्थानक अभिक्षमता परीक्षा 2026 ची परीक्षा आयोजित केल्यामुळे आणि याच दिवशी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व राज्यातील इतर ठिकाणी परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी दोन्ही ठिकाणी एका वेळी परीक्षा देऊन शकत नसल्यामुळे नियमित परीक्षेत तो नापास झाल्यास त्याच्या दोन गुणपत्रिका बनतील आणि त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर दोन गुणपत्रिका बघून प्रश्न निर्माण होणार आहेत त्यामुळे 07/02/ 2026 रोज शनिवार ला इतर परीक्षा आयोजित केलेल्या असेल तर ती रद्द करण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. भारत पांडे ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना केलेली आहे.

