लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन गंभीर तर एक जखमी
आष्टी (अशोक खंडारे):- लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण गंभीर तर एक तरुण किरकिर जखमी झाल्याची घटना आज दि २२ जानेवारी ला सकाळी ९.३० वाजताचे दरम्यान चौडमपल्ली गावाजवळ घडली
दुचाकिस्वार हे गुंडापल्ली येथून धनूर ला स्टाईल लावण्याचे काम करण्यासाठी जात असताना चौडमपल्ली गावाजवळ आलापल्ली कडून येणाऱ्या ट्रकने धडक दिली तेव्हा दुचाकीवरून खाली कोसळले व जखमी झाले ट्रक फरार झाला आहे तेजसिंग राजपूत वय २२ ,दिपक राजपूत २४, अशोक राजपूत २३ , तिघेही गुजरात राज्यातील असून हल्ली मुक्काम गुंडापल्ली जि. गडचिरोली येथे राहून स्टाईल लावण्याचे काम करत होते ते तिघेही भावंडेच आहेत त्यांच्या मागे येत असलेल्या भावाने आष्टी येथे माहीती दिली तेव्हा शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष पवण रामगिरकार यांनी रुग्णवाहिकेतून आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दोघांचे पायाचे हाड मोडले असल्याने पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे
अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत

