ग्रामपंचायत आंबटपल्ली अंतर्गत आदी कर्मयोगी अभियान शिवार फेरी संपन्न
आष्टी ( अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९)
दिनांक 30/09/2025 रोजी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदि कर्मयोगी अभियानाच्या संदर्भातग्रामपंचायत आंबटपल्ली तर्फे गावात शिवार फेरी घेण्यत आली.आदि कर्मयोगी अभियान हे भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाने सुरू केलेले एक राष्ट्रीय नेतृत्व विकास कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश आदिवासी समुदायांमध्ये विकेंद्रित नेतृत्व तयार करणे आणि त्यांना सक्षम करणे आहे. या अभियानाद्वारे आदिवासींना क्षमता विकास प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांना गावपातळीवर प्रभावी नेतृत्व करता येते आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवता येतो. 'आदि कर्मयोगी पोर्टल' हे या अभियानाचे डिजिटल माध्यम आहे, जे नोंदणी, प्रशिक्षण, आणि देखरेखीसाठी वापरले जाते. सदर शिवार फेरीत गावातील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्यविभाग,महिला बचत गट,, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, शिक्षक, तलाठी,तसेच इतर गावकरी उपस्थित होते व ग्रामविकास कृती आराखडा तयार करण्यात आला.
तसेच संदर्भीय विषयांन्वये गावाच्या विकासाच्या मुद्द्याबाबत चर्चा करण्यात आली. व गाव विकासाबाबत आराखडा तयार करण्यात आला.सदर शिवार फेरी व सभेला पुढील मान्यवर उपस्थित होते.
श्री. उमेश माधव कडते (सरपंच)
टी.के.रामटेके ( वनरक्षक )
श्री.आर.ए.गावडे ( वनरक्षक )
व्ही.जि.जेंगठे (आरोग्य सेवक)
एस.एस.वंगावार (स.आ.अ.)
सौ.के.के.नैताम ( अं.सेविका)
वैशाली जि.कलसार ( अं.सेविका )
कु.सी.एन.कुळसंगे ( शिक्षिका)
श्री.बी.एन.कुद्रपवार (जि.प.शाळा मुख्याध्यापक)
श्री.मंगरुजी एल.आलाम ( पो.पाटील)
श्री अक्षय पी. कुडमेथे (ग्रामपंचायत अधिकारी )यांची उपस्थिती होती.

