आठ वर्षीय मुलाला बिबट्या ने केले ठार

0
आठ वर्षीय मुलाला बिबट्या ने केले ठार 



 सिंदेवाही, १९ सप्टेंबर – सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारी सायंकाळी एका आठ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

प्रशिक बाबन मानकर (८) असे मृत मुलाचे नाव आहे. तो गावातील मस्कार्‍या गणपतीच्या सामुदायिक भोजनासाठी गेला होता. रात्री साडेसातच्या सुमारास जेवण झाल्यावर तो आपल्या काकासोबत घराकडे, किल्ला रोडवरून परत येत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घेतली
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याने मुलाला जबड्यात पकडले आणि जवळच्या टेकडीकडे ओढत नेले. जमावामध्ये प्रचंड घबराट पसरली. लोकांनी बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशिकला वाचवता आले नाही. त्याचा मृतदेह आज (१९ सप्टेंबर) गडबोरी टेकडीजवळ सापडला. घटना घडल्यावर गडबोरी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती, मागील २ दिवसापासून बिबट परिसरात दिसत होता, याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाला माहितीही दिली होती मात्र त्यांनी यावर हतबलता दाखवली. गडबोरी गावातील नागरिक वनविभागवर चांगलेच संतापले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !