जन्मदातीच्या विरहात विहिरीत उडी घेऊन एका तरुणाची आत्महत्या
आष्टी, ( अशोक खंडारे):- जन्मदातीच्या विरहात मानसिक तणाव घेतलेल्या एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना गुरुवारी (दि. ११) आष्टी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रामनगट्टा येथे उघडकीस आली. भालचंद्र विनायक पेंदाम वय २९ वर्षे, रा. रामनगट्टा, ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृताचे नाव आहे. भालचंद्रचा काका वसंत पेंदाम यांच्या
तक्रारीनुसार भालचंद्र हा मागील ३ महिन्यांपासून आईच्या मृत्युमुळे सतत तणावात राहायचा. त्याने वेडसरपणाच्या भरात रामनगट्टा येथील शेतशिवार व जंगल
परिसराला लागून असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आला शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला घटनेचा मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

