महामंडळाने धान खरेदी केली परंतू उचल केली नही, पावसाने सडले धान, दुर्गंधीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात

0

महामंडळाने धान खरेदी केली परंतू उचल केली नही, पावसाने सडले धान, दुर्गंधीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात 


 भामरागड ( क्रिष्णा गावडे) :- तालुका स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ताडगाव येथील सबरी
महामंडळाच्या धान खरेदी गोदामात सडलेल्या धानामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे 
 मागील वर्षी खरेदी केलेले धान पावसामुळे कुजले असून त्यातून निघालेले घाण पाणी गोदामालगतच्या खड्यात साचले आहे. यामुळे एवढी दुर्गंधी वास येतो आहे की त्या परिसरातील रुग्ण, व्यापारी ,प्रवासी व स्थानिक रहिवासी यांचे दैनंदिन जीवनावर मोठा प्रिन्स होतांना दिसुन येतो आहे

गोदामालगतच वनकर क्लिनिक व बालाजी मेडिकल असल्याने उपचारासाठी येणाऱ्या
रुग्णांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. बसस्टॅण्डकडील मार्गही या पाण्याने अडवला असून, बाबुलाई शेतकरी उत्पादक कंपनी व कमला गॅस एजन्सीपर्यंत जाणारे नागरिक दररोज नाक दाबून मुक्याचा मार सहन करीत आहेत. पन्नासाहून अधिक रहिवासी या संकटात सापडले व कोंडलेल्यागत त्या दुर्गंधीमुळे गुदमरून गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे नगरपंचायत प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी 
सदर बाबतीत फिकीर नसल्याने संताप उसळला आहे.

"नगरपंचायतीला नागरिकांच्या आरोग्याशी काही देणंघेणं नाही. त्यांचे लक्ष फक्त ठेकेदारकीच्या कामांवर आहे. स्वच्छता ही त्यांच्यासाठी शेवटची प्राथमिकता असावी असे स्पष्ट दिसते," अशी तीव्र प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली आहे 

आरोग्य विभागाकडूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने रोगराईचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. डासांची प्रचंड पैदास होत असून डेंग्यू, मलेरिया , व स्वसनाचे आजार यांसारख्या साथरोग उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

"जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून रास्ता रोको करु त्यवेऊ झालेल्या गोंधळाची जबाबदारी नगरपंचायतीवरच असेल," असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !