सयंत्रामध्ये उंदरांचा सुळसुळाट, शहरातील पाणीपुरवठ्यात खडखडाट

0
सयंत्रामध्ये उंदरांचा सुळसुळाट, शहरातील पाणीपुरवठ्यात खडखडाट 



नांदगाव:- येथील पाणी पुरवठा उंदरांनी बंद केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे 
शहरवासीयांना पाण्यासाठी दाहीदिशा करण्यास दोन उंदीर कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या नांदगाव उपसा केंद्राच्या ट्रॉन्सफॉर्मरमध्ये बिघाड दोन उंदिरामुळे झाला. वायर कुरतडत असतांना शॉर्ट सर्किट झाल्याने मुख्य सयंत्र जळाला अशी विस्वासनिय माहीती प्राप्त झाली आहे. त्यामुळे नदीतून होणारा पाण्याचा उपसा थांबला गेला. परिणामी, शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे यासाठी शहरवासीयांना चार दिवसापासून घराघरात नळ मात्र पाण्याचा एक थेंब मिळणे दुरापास्त झाले आहे. पाणी पुरवठा करणारा सयंत्र (Water supply system) जळाल्याने शहरातील पाणी पुरवठा चार दिवसापासून बंद आहे. यामुळे लोकांना घरगुती गरजांसाठी आणि इतर कामांसाठी पाण्याची कमतरता भासत आहे व भटकंती करावी लागत आहे. याची नगर प्रशासनाला जाण असून यावर उपाय योजना केल्या जात असून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. जळालेल्या सयंत्राच्या दरूस्तीचे काम संबंधित कंत्राटदाराकडे दिले असता, या गोष्टीला पूर्ण होण्यासाठी अजून ४८ तासांचा कालावधी लागणार असल्याचे नगर पंचायत कार्यालयाने सांगितले. नांदगांव येथील मुख्य जलस्त्रोतातून पाण्याचा सर्वत्र पुरवठा होतो. तेथूनच शुद्धीकरण - प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण संयंत्रांमध्ये नेले जाते. जल शुद्धीकारणातून निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वितरणप्रणालीद्वारे घरोघरी वितरीत करण्यात येते. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने वाहिनीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. जल वाहिनीच्या दुरुस्तीसाठी अंदाजे ४८ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगर प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !