आष्टी पोलीसांनी सुगंधीत तंबाखू तस्करस केले जेरबंद, तंबाखू सह ७७७३२५ रुपयाचा मुद्देमाल जप्त

0
आष्टी पोलीसांनी सुगंधीत तंबाखू तस्करस केले जेरबंद, तंबाखू सह ७७७३२५ रुपयाचा मुद्देमाल जप्त 



आष्टी,(अशोक खंडारे) 
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीसांनी सुगंधीत तंबाखू तस्कराच्या मुसक्या आवळल्याची घटना दि.१८ जून ला सायंकाळी सहा वाजता घडली.१९ जून ला आरोपीस अटक करुन विविध कलमाव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
वन उपज तपासणी नाक्यावर पोलीसांनी नाकेबंदी केली असता मयुर पंढरी पोहनकर वय २९ वर्षे रा.करंजी ता.गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर हा रेनाल्ड डस्टर क्र.एम.एच.०५ बिएस २२०६ ने आष्टी कडे येत असताना सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध सुगंधीत तंबाखू (ईगल हुक्का) व सिग्निचर असा ७७३२५ रुपयाचा माल मिळून आला वाहनाची किंमत ७ लाख रुपये असा एकूण सात लाख सत्याहतर हजार तिनशे पंचेविस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 
सदर कारवाई पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई संजय राठोड यांनी केली पुढील तपास पोउपनी सोमनाथ पवार करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !