आतापासूनच कामाला लागा आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम यांचे कार्यकर्त्यांना कानमंत्र

0
आतापासूनच कामाला लागा
आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम यांचे कार्यकर्त्यांना कानमंत्र 


रांगोळीने बाबांचे हुबेहूब फोटो रेखाटण्यात आले

जावेद अली यांच्यासह बहुसंख्य  कार्यकर्त्यांनी  पक्षप्रवेश केला !


अहेरी:-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळविण्यासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागा असे कानमंत्र माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांना दिले.
ते शुक्रवारी येथील वासवी सेलिब्रेशन हॉल  येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना जोश भरविताना कानमंत्र दिले.
या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम होते. तर मंचावर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू भैय्या हकीम, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे महत्वाचे निवडणुका असतात, एक हाती सत्ता मिळविणे हे माझे ध्येय असून   उमेदवार नेतृत्व व कर्तृत्ववान असले व परिस्थितीने गरीब जरी असले, तरी त्याला निवडून आणण्यासाठी आर्थिक व अन्य मदत व पाठबळ देण्यासाठी ' पैसा कितीही लागो.. ' मी तत्पर असल्याचे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला व टाळ्यांचा कडकडाट झाला.
याच वेळी सामाजिक कार्यकर्ते जावेद अली यांचे सह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश झाला. आमदार डॉ .धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 'घडी 'दुपट्टा गळ्यात टाकून जंगी स्वागत केले.
    उल्लेखनीय म्हणजे हॉलच्या प्रवेश द्वाराजवळ सुरेंद्र अलोणे यांच्या संकल्पनेतून आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे हुबेहूब फोटो रेखाटण्यात आले , आढावा बैठकीत रांगोळीने रेखाटण्यात आलेले हुबेहूब फोटो हे आकर्षणाचे केंद्र होते.
     यावेळी प्रामुख्याने बबलू भैय्या हकीम, रियाज शेख, सुरेंद्र अलोणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आढावा बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी यांनी तर सूत्रसंचालन रतन दुर्गे यांनी केले. यावेळी अहेरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्लेन क्रॅशच्या मृत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आले
      गुरुवारी दुपारी गुजरात येथील अहमदाबाद वरून इंग्लंडच्या लंडन दिशेने  उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. 241 प्रवासी मृत पावले, त्यात प्रामुख्याने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश होता.मृत हुतात्म्यांना आढावा बैठकीच्या प्रारंभी दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !