आष्टी उपडाकघर येथील कार्यरत ग्रामीण डाक सेवकांचा संपात सहभाग
आष्टी परिसरातील टपाल सेवा खोळंबली.
आष्टी दि.१३:- ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन व नॅशनल युनियन ग्रामीण डाक सेवक या संघटनेच्या वतीने डाक सेवकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. यामुळे टपाल सेवा पूर्णतः कोलमडणार आहे.
आष्टी उपडाकघर अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण डाक सेवका या संपात सहभाग सहभागी झाल्याने आष्टी परिसरातील टपाल सेवा खोळंबली आहे.
ग्रामीण डाक सेवकांना आठ तास कामांचा मोबदला देण्यात यावा, डॉ कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारसीनुसार 12,24,36 वर्षाच्या नोकरी नुसार पदोन्नती देण्यात यावी, वेतन टी. आर सी. ए. मिळावा संचालन याकडून अत्याधिक व अव्यवहारीक उद्दिष्ट्ये टारगेट देऊन जी. डी. एस. चा छळ थांबविण्यात यावा, विभागीय स्तरावर अधिकाऱ्याकडून बेकायदेशीर आदेश काढून टारगेटच्या नावावर दमदाटी करणे, बदली करणे अर्वाच्य भाषा वापरणे, धमकी देणे इत्यादी गैरप्रकार थांबविण्यात यावे, ग्रॅज्यूईटी दिड लाखा ऐवजी पाच लाख करण्यात यावी, वैद्यकिय सेवा देण्यात यावी, एस डी बी एस योजनेत वाढ करण्यात यावी आदी मागण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात आष्टी उपडाकघर अंतर्गत कार्यरत ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन व नॅशनल युनियन ग्रामीण डाक सेवक या संघटनेच्या सदस्य असलेल्या बाबुराव जोरगलवार, आनंद गलबले, प्रकाश पेंदोरकर, अतुल सरकार, विठ्ठल पोतराजवार, बंडू मेदाळे,अशोक गद्दे,राजू येलमुले,मनोहर निखाडे, रामदास ओझलवार, बळीराम ईजमनकर, जितेंद्र येलमुले,पवन बोनगिनवार,भारत बोलुवार, वैभव चोप्पावार,वैभव कांबळे,रवीना नैताम, भारती नारनवरे इत्यादी ग्रामीण डाक सेवकांनी संपात उस्फुर्त सहभाग घेतला आहे.

