साधना जरातेच्या कुटुंबाचे भोई ढिवर व तत्सम जाती संघटनेने केले सांत्वन व न्याय देण्यासाठी दिले निवेदन
सोपानदेव म्हशाखेत्री धानोरा
शस्त्रक्रिया दरम्यान मृत पावलेल्या साधना संजय जराते यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्याबाबत व हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्याबाबतचे निवेदन आज तहसीलदार धानोरा यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले. यात जिल्हा भोई,धिवर व तत्सम जाती समाज तालुका संघटना धानोराचे वतीने प्रकाश मारबते यांच्या नेतृत्वात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले तत्पूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जराते परिवाराची भेट घेऊन कारवाफा येथे कुटुंबियांचे संत्वांन करताना , शस्त्रक्रियादरम्यान मृत पावलेल्या साधना जराते त्यांच्या बाबतची विचारपूस करून, कुटुंबीयांना सांत्वना दिली. व हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन धानोरा तहसीलदार मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. संघटनेच्या पदाधिकारी यांनी म्हटलेले आहे की करवाफा येथील मृत साधना संजय जराते वय 23 वर्षे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करीता आठ डिसेंबर 2023 ला प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा येथे दाखल झाल्या होत्या .परंतु शस्त्रक्रिया दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यात असे लक्षात येते की ग्रामीण आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्यासारखे दिसून येत आहे. आणि येथील बेजबाब्दार डॉक्टरवर ती कारवाई होने अत्यंत गरजेचे आहे .आणि साधना संजय जराते यांच्या शस्त्रक्रिया दरम्यान मृत झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकात ग्रामीण आरोग्य यंत्रणे विषयी, जनतेमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झालेला आहे. तरी अशी शस्त्रक्रिया करणारा बेजेबाबदार, हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांना तात्काळ निलंबित करून, मृत पावलेल्या साधना संजय जराते यांच्या परिवाराला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन धानोरा तालुका संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना तहसिलदारांचे मार्फत देण्यात आलेले आहे. सांत्वन करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकरे, उपाध्यक्ष कान्होजी मेश्राम, सचिव नवनाथ मरबते,सोशल मीडिया प्रकाश मारबते व कारवाफाचे प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते

