डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवतेचे महान उपासक होते -डी. के. साखरे

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवतेचे महान उपासक होते -डी. के. साखरे


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

मंगळवेढा -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवही नव्हते व देवदूतही नव्हते तर ते मानवतेचे महान उपासक होते, असे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे राज्य अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले. शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवेढा येथे आयोजित कार्यक्रमात साखरे बोलत होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
      पुढे बोलताना साखरे म्हणाले 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली व 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह त्यांनी बौध्द धम्म स्वीकारला.
 बाबासाहेबांनी जर एखादा अराष्ट्रीय धर्म स्वीकारला असता तर याच देशात दुसरे एखादे राष्ट्र निर्माण झाले असते. यावेळी कृती समितीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष औदुंबर लंगडे, महिला तालुकाध्यक्ष वैशाली चंदनशिवे, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वरपे, बौद्धाचार्य दशरथ शिवशरण, अकुश खवतोडे, कृषिविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,पंकज मस्के, सुरेश परकाळे जयंत कुंभारे, शब्बीर सय्यद, समर्थ (भैय्या )साखरे, माधुरी चंदनशिवे यांच्यासह मोठया संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !