पूर ओसरेपर्यंत करावी लागते प्रतीक्षा
क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी वैनगंगा वार्ता १९
अहेरी:-
अहेरी तालुक्या पासून 25 किलोमीटर असलेल्या वट्रा खुर्द नाल्यांवरील पुलांची उंची कमी असल्यामुळे पुराचे वाहणारे पाणी ओसरे पर्यंत नागरिकांना प्रवास करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असुन या पुलांची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कमी उंचीच्या पुलावरून पावसाळ्यात कित्येक वेळा पुराच्या पाण्यात वाहने वाहुन जावून नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना घडल्या असतांना प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.गेल्या पंधरा ते वीस वर्षे पहिले बी आर ओ मार्फत लहान पुलाचे बांधकाम झाले होते असे धोकादायक पुलाच्या पलीकडच्या गावाकडे जाणारे मुख्यमार्ग असून व्येंकटापुर, अवलमारी,करणेली, लांकाचेन, मोयाबिनपेठा एकमेव मार्ग असून या गावांसह अनेक ठिकाणी नदी, नाल्यांवर असलेल्या या पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी वाढून हे पुल पाण्याखाली जातात परिणामी नागरिकांना प्रवास करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.
कमी उंचीचे पुल पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना शहरात किंवा शिक्षणाची सोय असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे तसेच एखाद्या गावातील रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी पूर ओसरेपर्यंत वाट पहावी लागते. जर एखादा अत्यवस्थ रुग्ण असेल तर त्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव सुद्धा गेल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. जेव्हा पूर कमी होईल तेव्हाच या पुलांवरून प्रवास करणे शक्य होत असल्याने कमी उंचीचे पुल नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. नागरिकांनी या पुलांची उंची वाढविण्यासाठी अनेक वेळा सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी केली. परंतू नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला ना संबंधित बांधकाम विभागाला वेळ आहे. ना लोकप्रतिनिधींना फुरसत. कमी उंचीचे पुल नागरिकांच्या जीवावर उठले आहेत.
या कमी उंचीच्या पुला मुळे नेहमी पावसाळ्यात या विभागातील गावाना आणि नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी या नाल्या जवळ तासनतास ताकडत बसून नेहमीच अडचणीचा सामना करावा लागत आहे. नेहमी या विभागातील नागरिक लोकप्रतिनिधी कडे तक्रार करून सुध्दा दुर्लक्ष होत आहे.
नागेश पेंदाम
सामाजिक कार्यकर्ता,वट्रा खुर्द

