गडचिरोली:-
जे.टी.एम स्टार इवेन्ट प्रेजेन्ट्स ग्लॅम फेस ऑफ विदर्भ आणि अवार्ड शो सिझन २ दिनाक १३ सप्टेंबर २०२३ ला सुमानंद सभागृह गडचिरोली येथे मराठी कलाकार सैराट मुव्ही फेम आकाश ठोसर (परश्या) सेलिब्रेटी गेस्ट यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन इव्हेन्ट्स आयोजक ज्योती उंदिरवाडे तसेच मोनिका निबेकर यांनी केले होते..
दरम्यान जे.टी.एम स्टार इवेन्ट प्रेसेन्ट्स ग्लॅम फेस ऑफ विदर्भ आणि अवार्ड शो सिझन १ मॉडेल "तु माझा सारथी" मराठी म्युझीक अलबम चे पोस्टर आकाश ठोसर (परश्या) यांच्या हस्ते लाँचींग करण्यात आले आणि मुख्य बालकलाकार तन्मय उंदिरवाडे, संप्रेक्षा खोब्रागडे, मुख्य कलाकार गणेश व्हवहारे, भावना चौधरी, सह कलाकार प्रिती रंगारी, प्रकाश रंगारी यांचा स्वागत करुन गौरवण्यात आले.
मॉडेलिंग स्पर्धेमध्ये १००, ब्रायडल मेकअप स्पर्धा ३०, मेहंदी डिझाईन स्पर्धा ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. तसेच विविध क्षेत्रातील लोकांना ५० अवार्ड सेलिब्रेटी कडुन देऊन गौरवण्यात आला. मॉडेलिंग स्पर्धेमध्ये समृद्धी तोहगावकर ही किडगर्ल कॅटेगिरी मध्ये विनर झालेली आहे तसेच अमायरा वासनिक
फर्स्ट रनर अप आणि आदिती कळमकर ही सेकंड रनर अप झालेली आहे. किडबॉय कॅटेगिरी मध्ये सोहम बिसेन हा विनर झालेला आहे तसेच प्रेम शिंदे फर्स्ट रनर अप आणि अंकुश फुलवंशी सेकंड रनर अप झालेला आहे. टिनगर्ल कॅटेगिरी मध्ये सोनम मत्ते विनर तसेच फर्स्ट रनरअप श्रुष्टी कोहळे आणि रुची गेडाम ही सेकंड रनरअप झालेली आहे. मिस कॅटेगिरी मध्ये विनर प्रचिती, श्रावणी तुलकाने ही फर्स्ट रनरअप आणि निकीता रामावत सेकंड रनरअप झालेली आहे.. मिस्टर कॅटेगिरी मध्ये ऐअसान रजा हे विनर तसेच प्रज्वल गाडेकर हा फर्स्ट रनर अप, सुजित निबेकर आणि
सुहास मोहुर्ले हे सेकंड रन अप झालेले आहेत. मिसेस कॅटेगिरी मध्ये राणी ढोके ही विनर झालेली आहे तसेच प्रियंका देवले ही फर्स्ट रनर अप झालेली आहे आणि अन्नपुर्णा मडावी ही सेकंड रनर अप झालेली आहे. मॅनहन्ट कॅटेगिरी मध्ये अजय रंगारी हे विनर झालेले आहेत तसेच निखिल मुन हे फर्स्ट रनर अप झालेले आहेत. ॲन्ड पेरेंट्स मध्ये छायाताई कुंभारे विनर आहेत, नलिनी बोरकर हे फर्स्ट रनर अप, अंजली वैरागडवार हे सेकंड रनर अप झालेले आहेत. ब्रायडल मेकअप स्पर्धेचे विनर अल्का काशीकर, स्मिता जांभुळकर हे फर्स्ट रनरअप, हर्षदा धंदरे है सेकंड
रनरअप आलेली आहे. मेहंदी स्पर्धेचे विनर प्रियंका गावतुरे हे विनर राणी कोरेमोरे हे फर्स्ट रनरअप, इशिता रोहाडा ही सेकंड रनरअप आलेली आहे. सर्व विनर, स्पर्धकांना ट्राफी, क्राऊन, गिफ्ट हॅम्पर (सिल्वर कॉईन), टायटल्स, प्रमाणपत्र आकाश ठोसर (परश्या) सर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आला.
दरम्यान इन्स्टा फेम साहिल कडक यांनी आपला डॉयलॉग परफॉर्म करुन उपस्थित प्रेक्षकांचे मने जिंकली. अशाप्रकारचे विविध स्पर्धा आणि सेलिब्रेटी स्टेज जिल्ह्यातील स्पर्धकांकरीता उपलब्ध करून इव्हेंट च्या माध्यमातुन म्युझिक अलबम, मुव्ही, टी.व्ही. रियालिटी शो असे अनेक स्टेज उपलब्ध करुन देणार असे आव्हान इव्हेंट
आयोजक ज्योती उंदिरवाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला खासदार अशोक नेते साहेब, मा. प्रचित पोरेड्डीवार, मा. रोहिदासजी राऊत सर, आमदार मा. देवराव होळी, मा. रामभाऊ मेश्राम, मा. मनोज देवकुले, मा. होकम सर, मा. मल्लिक बुधवानी सर, डॉ. खुशबु दुर्गे, मा.
पुण्यवान साखरे, मा. पंकज गोरमोडे, मा. सतिश विधाते, मा. भुपेश डोंगरे, चेतना बटुवार मॅडम, कुंभारे मॅडम, रोहित खोब्रागडे, स्वप्निल हेमके, मोहुर्ले सर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. मॉडेलिंग स्पर्धेचे निरीक्षण अॅड. कविता मोहरकर आणि डॉ. गणेश व्यवहारे यांनी केले, मेकअप स्पर्धेचे निरिक्षण
सायली राऊत, स्नेहल पाल यांनी केले. माडेलिंग गृमिंग स्वप्निल लोखंडे, सेजल सातपुते, बिपाशा भुरसे, रविना धकाते यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विनय राऊत आणि विक्की शान यांनी केले. मोना गायत्री आणि प्रियंका यांनी ड्रेस डिझायनिंग केले. तसेच तन्मय उंदिरवाडे, मानस उंदिरवाडे, आर्यन बांबोळे, भुषण टेंभुर्णे, मयुर टेंभुर्णे, अनुश्री निमसरकार, भारती मोटघरे, सुजित गोवर्धन, भारत राठोड, स्मिता खोब्रागडे, अश्विनी भांडेकर, चेतन सातपुते, पी डी फोटोग्राफर, चेतन हेमके,यांनी सहकार्य केले.

