आष्टी पोलीसांनी अपघात करुन पसार झालेला ट्रक चालक व ट्रकला केले जेरबंद

0
आष्टी पोलीसांनी अपघात करुन पसार झालेला ट्रक चालक व ट्रकला केले जेरबंद 



अशोक वासुदेव खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
दिनांक १६/०९/२०२३ रोजी पोलीस अंमलदार- प्रणय ताराचंद वाळके, वय-२९ वर्ष, रा. मुधोली चक.०२. ता. चामोशी, जि. गडचिरोली हे आपले ताब्यातील दुचाकी क्रमांक एम. एच. ३३ एन.०१५९ या वाहनाने डोक्याला हेल्मेट लावुन गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे कर्तव्यावर येनापुर ते गडचिरोली या मार्गे जात असतांना मौजा अड्याळ पासुन ०२ किमी अंतरावर मुख्य डांबरी रस्त्यावर कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे, बेदरकारपणे, हयगयीने uttereree स्थितीत वाहन चालवुन यातील पोलीस अंमलदार हा चालवीत असलेल्या दुचाकीला जबर धडक देवून त्याचे मरणास कारणीभुत होवुन घटनास्थळावर पसार झाल्याने अज्ञात वाहन चालकाविरुध्द पोस्टे आष्टी २४३/२०२३ कलम २७९,३३७, ३३८,३०४(अ) भादवि सहकलम १३४ (अ) (ब) १८४ मोवाका अन्यये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर दाखल गुन्हयात अपघात घडवून घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहनाचा कोणत्याही प्रकारची माहीती नसतांना पोलीसांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करुन अज्ञात आरोपीचा शोध करीता लागलीच घडल्या विकाणापासून आष्टी पर्यंत संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तसेच महत्वाचे साक्षीदार यांना गुन्हा तपासून सदर गुन्हयात ट्रक क्रमांक- CG-08-1-3211 चे चालक नामे शुभम समीर माझी वय ३२ वर्ष, धंदा ट्रकचालक, रा.ता. पंखाजुर जि.कांकेर राज्य छत्तीसगड यांनी सदरचा अपघात घडवुन आणून पोलीस अंमलदार- प्रणय ताराचंद वाळके, वय-२९ वर्ष, रा. मुधोली चक.०२ ता. चामोशी, जि. गडचिरोली यांचे मृत्युस कारणीभूत ठरल्याचे तपासात निष्पन्न करुन आरोपी- शुभम समीर माझी वय ३२ वर्ष, धंदा ट्रकचालक, रा.ता. पंखाजुर जि.कांकेर राज्य छत्तीसगड पोस्टे आष्टी येथे दिनांक १९/०९/२०२३ रोजी २०/५० वा. अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात  पोलीस अधीक्षक निलोत्पाल  गडचिरोली अप्पर पोलीस अधिक्षक देशमुख अहेरी,    उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक  कुंदन गावडे  पोस्टे आष्टी यांच्या नेतृत्वाखाली सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी  पोउपनी मानकर  यांनी तसेच त्यांचे सहकारी टीम मपोउपनी / वणवे , मपोउपनी / जगताप , पोशि/ ५६७५ मेदाळे, पोशि/ ५६९० पंचफुलीवार, पोशि/५६६१ रायशिडाम, पोशि/३९५५ गोडबोले यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !