एसटीच्या महिला वाहकाने मिळविली शाबासकीची थाप

0
एसटीच्या महिला वाहकाने मिळविली  शाबासकीची थाप



सोपानदेव म्हशाखेत्री/उपसंपादक वैनगंगा वार्ता १९

  धानोरा:-
 एसटी महामंडळाची एम एच ०६.एस ८८४५ ही बस गडचिरोली आगारांमधून सुटली व सायंकाळी साडेपाच वाजता मुरुमगाव येथे नित्यनेमाने पोहोचली. मुरुमगाव मार्गे धानोरा ते गडचिरोली सायंकाळची शेवटची बस असल्यामुळे बहुतेक कर्मचारी प्रवासी याच एसटीने प्रवास करतात .मुरूम गाव वरून एसटी निघाली. तावेटोला या गावातील जनाबाई वडे यांनी एसटीला हात दिला .गाडी थांबली. एसटी थांबल्यानंतर ची वेळ सायंकाळची पाच पंचेचाळीसची असेल. जनाबाई वडे यांनी थेट वाहक माला सहारे यांना आपुलकीने म्हणाल्या की कंडक्टर बाई गाडी लवकर आणत जा ना  जी , रात्रीची वेळ होते पोरीला एकटीला सर्च ला जावे लागते कौशल्या तू कंडक्टर बाईजवळच बस .हे वाक्य ऐकून एसटी मधील प्रवासी आश्चर्यचकित झाले ..जणू काही त्या नात्यातील ओळखीच्या असल्यासारख्या बोलून गेल्या. एकंदरीत माला सहारे यांची प्रवाशासोबत वागणूक चांगली असेल, प्रेमळ असेल ,आनंददायी सेवा देत असतील ,म्हणून महिला वाहक माला सहारेवर कौतुकाची थाप देणे  ,व तेही एका आदिवासीबहुल तावेतोला  गावातील जनाबाई वडे सारख्या अनोळखी बाईकडून.... वाहक माला सहारे मात्र प्रवासी वर्गात प्रशंसनीय ठरल्याची चर्चा प्रवाश्यात रंगली.त्याच  एसटीत तावेटोला वरून जनाबाईची मुलगी कुमारी कौशल्या वडे ही सर्च ला जाण्यासाठी बसली.सर्च दवाखान्यात  आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे .ती पोळा सणासाठी तवेटोला या स्वगावी गेली होती. ती दोन वर्षापासून सर्च येथे सर्च संस्थापक डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग  यांचे मार्गदर्शनात  सेवा देत आहे .वाहकताई फार सौजन्यशीलतेने ,प्रेमळ वागणुकीने प्रत्येक प्रवाशांना सेवा देत असल्याचे कुमारी कौशल्या वडे हिने प्रतिनिधीला सांगितले. एरवी रोजची किटकिट, रोजचा  त्रास ,चिल्लर ,सुटे पैसे अभावी उद्धवनारा त्रास इत्यादी त्रास दायक बाबी कंडक्टर यांना रोजच सतावतात. तशाही स्थितीत प्रवाश्याप्रती सहानुभूती ठेवून आपली जबाबदारी अत्यंत सौजन्यशीलतेने, प्रेमळ स्वभावाने,प्रवाशांचे मन जिंकणे ही हातोडी मात्र माला सहारे या महिला वाहकांनी दाखवून दिले, हे मात्र खरे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !