शालेय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलीसांनी घेतले ताब्यात
आरमोरी (गडचिरोली)::
अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा आरोपीचा प्रयत्न फसला. ही घटना ३० ऑगस्टला दुपारी १२.१० वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यात घडली. घटनेची तक्रार पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करताच अवघ्या काही तासांत आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आली आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. मंगेश मोहन दुमाने (वय २२ असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असता पीडिता लहान भाऊ व आजीसोबत घरी होती. भावाला सुटी असल्याने तो खेळण्यासाठी बाहेर गेला तर आजी अंगणात बसली होती. त्यामुळे पीडित मुलगी घरी टीव्ही पाहत असताना आरोपी तिच्याजवळ आला व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली व आरडाओरड सुरू केली. त्यामुळे आरोपीने तिथून पळ काढला. ती रडत असताना तिचा लहान भाऊ घरी आला. बहिणीला रडत असताना पाहून त्याने . कामावर गेलेल्या आईकडे धाव घेतली व आईला ताई रडत असल्याचे सांगितले. ) पीडितेची आई आपले काम आटोपून घरी आली. तेव्हा पीडितेने घडलेला प्रसंग तिला सांगितला. लागलीच पीडितेच्या आईने आरमोरी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कसलाही विलंब न करता आरोपीला त्याच्या घरून जेरबंद केले. आरोपीवर भादंवि ३५४, सहकलम ८, १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार संजयकुमार टेकाम यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.

