तिघेजण करीत होते गांजा तस्करी , पोलीसांनी केले जेरबंद

0
 तिघेजण करीत होते गांजा तस्करी , पोलीसांनी केले जेरबंद 


चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अमली पदार्थांच्या तस्करीत मोठी वाढ झाली असून, अमली पदार्थ तस्कराचे जिल्हाभरात नेटवर्क वाढले आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून चंद्रपूर -बल्लारपूर बायपास मार्गावरून तिघांना अटक करून ५२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. यश राज दुर्योधन (१८, रा. बजाज शोरुम मागे टिचर कॉलनी, गडचिरोली), नेहाल इकरार ठाकूर (२१, रा. गोकुळनगर, गडचिरोली), सगीर खान ननुआ खान (३२, गोकुळनगर, गडचिरोली, मूळ पत्ता निकोनी साहायपूर, शाखेला मिळाली. गौतमबुद्ध नगर, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री करणे व बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर यांच्या नेतृत्वात अमली पदार्थ तस्करांविरोधात मोहीम राविण्यात येत आहे. यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, स्कार्पिओ क्रमांक एम एच. ३३ / ए. सी. ११०१ या गाडीने गांजा तस्करीसाठी आले असून, ग्राहक शोधत रुपये असल्याचे सांगितले जाते. असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाचा शोध घेत पाठलाग केला असता बल्लारपूर मार्गाने पळून
जात असताना पोलिसांनी सापळा रचून स्कार्पिओ वाहन अडविले. यावेळी स्कार्पिओतील व्यक्तीकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी गाडीची झडती घेतली असता प्लास्टिक पिशवीत पाच किलो २१३ ग्रॅम गांजा आढळून आला.. हा गांजा पोलिसांनी जप्त केला असून, जप्त गाजांची किमत ५२ हजार १३० आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांच्या नेतृत्वात शकील शेख, अनुप डांगे, मिलिंद चव्हाण, नितेश महात्मे, जमीर पठाण, प्रमोद कोटनाके, प्रसाद धुळगंडे, चालक रूपभ बारसिंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !