गोरगरीब जनतेचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यात अवैध दारूच जबाबदार , दारू मुळे गेला एकाचा जीव

0
गोरगरीब जनतेचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यात अवैध दारूच जबाबदार , दारू मुळे गेला एकाचा जीव 




आरमोरी-:
 गडचिरोली जिल्ह्यात कामगारांना काम मिळत नसल्याने परराज्यात  जाऊन कष्ट करून पैसे मिळवून घरी परतला पण दारूबंदी जिल्ह्यात एवढी दारु मिळते की अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. जनमानसात बोंब सुरू आहे दारू पिऊनच मेला तरी पण सबंधित विभाग एवढं सुस्त का? दारू विक्री संबंधाने मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रकाशित होत आहेत आणि डॉन कोण हे ही माहीत आहे तरी पण कारवाई शून्य का? अशातच आरमोरी  तालुक्यातील वैरागड येथून जवळच असलेल्या सुकाळा येथील इसम वैरागड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेढेबोडी येथे पांदण रस्त्याने पायी आला होता. नंतर तो गावाकडे परत जाताना मेढेबोडी येथील शेतात आज गुरुवारी सकाळी ११ सुमारात मृता अवस्थेत आढळून आला.

अण्णा देवराव वटी (५५) रा. सुकाळा असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गुरुवारी सकाळी सुकाड्यावरून मेंडेबोडी येथे दारू पिण्यासाठी मेंढेबोडी सुकाळा दरम्यान असलेल्या पांदण रस्त्याने पायी दारू पिण्यासाठी आला होता असे लोकांचे म्हणणे आहे.

त्याला नंतर त्याच रस्त्याने सुकाळा येथे आपल्या गावी परत जाताना रस्त्यादरम्यान असलेल्या देवानंद कोटांगले यांच्या शेतात अति दारू पिल्याने तो त्याच ठिकाणी पडला असावा व मृत्युमुखी पावला अशी चर्चा आहे.

याबाबत आरमोरी येथील पोलिसांनी तक्रार नोंद  केली असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत मृतक हा परराज्यात मजूरीसाठी गेला होता. दोन दिवसा पूर्वी तो स्वगावी परतला त्याच्या पश्चात पत्नी व बराच मोठा परिवार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !