ट्रक आणि बस चा भीषण अपघात ट्रक चालक गंभीर तर १२ प्रवासी जखमी
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभिड-:
आज दिनांक 1 सप्टेंबर 2023 शुक्रवार सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान ट्रक आणि बस यांची आमने सामने धडक झाल्याने ट्रक चालक गंभीर तर बारा प्रवासी जखमी झाले. अपघात एवढा भयानक होता की बस आणि ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा होऊन ट्रक ड्रायव्हर ट्रक मध्ये एक तास फसुन राहिला. क्रेनच्या सहायाने त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला नागपूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले.
सविस्तर वृत्त असे आहे की ब्रह्मपुरी आगारची ब्रह्मपुरी ते अमरावती बस क्रमांक एम एच १३ सी यु ८३३७ ही बस सकाळी सात वाजता ब्रम्हपूरी वरून सुटली त्यामध्ये वाहक म्हणून सौ, रीना प्रकाश मेश्राम व बस चालक अविनाश रमेशराव उंबरकर हे होते. नागभीड समोर एक किलोमीटर अंतरावर नवखडा जवळ नागपूरवरून वडसा कडे गॅरेजचा माल घेवून येत होता तर बस ब्रम्हपूरी वरून नागपूर कडे जात होती. ट्रक ड्रायव्हर ने बस च्या दिशेने आणून बसला धडक दिली यामध्ये बस चालक, बसवाहक, ट्रक ड्रायव्हर यासोबत प्रवासी जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दाखल करण्यात आले तर ट्रक ड्रायव्हर यांचे दोन्हीही पाय निकामी झाल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास नागभीड पोलीस स्टेशन येथील ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक साखरे हे करीत आहेत.
जखमीचे नाव..1) अविनाश रमेश उंबरकर (४०), बस ड्रायव्हर,2)रीना प्रकाश मेश्राम ३८ वर्ष,(बस वाहक)(३)मारोती प्रभाकर कापगते वय ४९, रा . नवेगाव बांध (४) मुकेश सुधाकर निकोसे २८वर्ष रा. वाढोना, ता. उमरखेड, जिल्हा.नागपूर
(५)स्नेहा गोविंदा वरटे २०वर्ष रा. खैरी ता. चिमूर
६)विलास मारोती विधाते वय 48 वर्ष राहणार वडसा (७)संजय रामकृष्ण मोहदे वय 54 वर्ष राहणार ब्रह्मपुरी (८)मनीषा मोहदे वय 48 वर्षे(९) श्लोक संजय मोहदे वय 16 वर्ष राहणार ब्रह्मपुरी(१०) महेंद्र केवळराम करंबे वय 44 वर्षे ब्रह्मपुरी (११)मंथला महेंद्र करंबे वय 34 वर्ष (१२)अर्धाश महेंद्र करंबे वय सात वर्ष (१३)तुकाराम रामदास चावडे वय 78 वर्षे ब्रह्मपुरी असे जखमी झालेल्या इसमांचे नावे आहेत
नागभीड ते कांपा रोड खूपच अरुंद असल्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत असतात. ह्या रस्त्याचे साईडींग खोल आहेत, रुंदीकरण लवकरात लवकर व्हावे अशी जनतेची मागणी आहे.

