No title

0
शेतात लावलेल्या विद्युत ताराच्या प्रवाहाने वन्य प्राण्यासह दोन व्यक्ती जागीचं ठार


अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभिड----नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड शेतशिवारात विद्युत तारांच्या स्पर्शाने वन्य प्राणी सह दोन व्यक्ती ठार झाल्याची घटना नागभीड पोलीस नोंदीवरून घेण्यात आली आहे
नागभीड शहराला लागून असलेल्या शेताशिवारात वन्य प्राण्याचा मोठ्या प्रमाणात हौदोस असल्याने शेत पिकाचे वन्य प्राणी नुकसान करू नये यासाठी शेतकरी यांना झटका लागून वन्य प्राणी नुकसान करू नये अशी वन विभागाकडून व्यवस्था केली जाते, मात्र इतर ठिकाणी शेतकरी शौरुउर्जा झटका मशिन, ऐवजी विद्युत ताराचा प्रवाह सोडून बंदोबस्त करीत असतात माजी वन विभाग तील अधीकारी 10 वर्षीपासुन शेती व्यवसाय करित असलेले नारायन दामोदर लेणेकर यांनी काल दिनांक १९जानेवारीला 2023 रोजी सांयकाळच्या सुमारास ह्यांनी आपले शेत पिकाचे वन्य प्राणी नुकसान करू नये म्हणून सौरुउर्जा बॅटरी व विद्युत ताराचा प्रवाह आपल्या शेतात सोडण्यात आला होता यावेळी या प्रवाहात वन्य प्राणी डुकर अडकून ठार झाला तर त्याचेच शेताचे बाजूला असलेला शेतकरी गुरुदास श्रीहरी पिसे वय वर्ष 52 हे विधुत ताराच्या प्रवाहात अडकून जागीच ठार झाले,
 तसेच त्यांच शेतशिवरात दांचेवार परिवाराची शेती बटईन (भांड्याने) करणारे शिवनगर येथील रहिवाशी देवनाथ रामदास बावनकर हे सांयकाळच्या सुमारास शेतात मोटार पंप चालू करण्यास गेले असता त्यांच बाजुच्या शेतकरी रामाजी सहारे यांच्या घरच्या व्यक्ति नी शेतात सौरु उर्जा बॅटरी व विधुत ताराच्या प्रवाहात देवनाथ शेतशिवर फिरत असतांना अडकल्याची घटना त्यांच दिवसी उघडकीस आली अशी माहिती त्यांचे साडा रवींद्र दुधराम देशमुख यांनी पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रार नोंदवितांनी त्याला विद्युत ताराचा प्रवाहाचा स्पर्श होऊन अडकल्याने देवनाथ रामदास बावनकर वय ४५, हे जागीच ठार झाले,व गुरूदास श्रीहरी पिसे वय ५२वर्ष नागभीड हे दोघेही प्रवाहाणे ठार झाले असून सदरचा गुन्हा दाखल करून न्यायालयात शेतकऱ्यांस हजर करण्यात आले असता मा न्यायालयाने कु, गणेश मुखरु सहारे वय 20 , नारायण लेनेकर वय 70 यांना चद्रंपुर जिल्हा कारागृहात कोठडी सुनावली असून अपराध क्रमांक ३४४/२४अन्वये कलम ३०४भा द वी दाखल करून पोलीस निरीक्षक योगेश घारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आकाश साखरे पुढील तपास करीत आहे सदर घटनेचा वन विभाग, वीज वितरण कंपनी यांनीही आपला पंचनामा करून गुन्हा दाखल केला असल्याचे विस्वासनिय सूत्राकडून कळते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !