वैनगंगा नदी पात्रात आढलला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा प्रेत

0
वैनगंगा नदी पात्रात आढलला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा प्रेत


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता 

आरमोरी पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये तरंगताना कुजलेल्या अवस्थेमध्ये महिलेचे प्रेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे अरसोडा येथील शेतकरी शालिक पत्रे हे आपल्या शेतावर गेले असता त्यांना नदीपात्रात तरंगताना कुजलेल्या अवस्थेमध्ये प्रेत दिसून आले. लागलीच शालिक पत्रे यांनी आरमोरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आरमोरी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन प्रेताच्या पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतला सदर महिलेच्या कानामध्ये बिऱ्या घातलेल्या आहेत. आणि तिच्या ब्लाउज मधून कापडी रंगाची लालसर एक कापडी पर्स मिळालेली आहे. त्या पर्समध्ये एक बसची टिकीट मिळाली असून त्या तिकिटावर पवनी असा उल्लेख असल्याने यावरून सदर महिला ही पवनी परिसरातील असावी असा अंदाज वर्तवीण्यात येत आहे .सदर घटनेचा तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप मांडलीक करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !