साधूच्या वेशात असलेल्या आरोपीला पकडण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी परिधान केला साधूचा वेश

0
 साधूच्या वेशात असलेल्या आरोपीला पकडण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी परिधान केला साधूचा वेश 
साधूच्या वेशात असलेल्या आरोपीला पकडण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी परिधान केला साधूचा वेश 



अशोक खंडारे मुख्य संपादक 


 गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्याने साधूच्या वेशात असलेल्या आरोपीला पकडण्यास आपणही परिधान केला साधूचा वेश व पकडले खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला.
कोरची तालुका अंतर्गत येत असलेल्या कोचिनारा येथील आरोपी प्रीतराम धकाते याने दोन जुलैला आपल्या पत्नीची जंगलामध्ये कुऱ्हाडीने हत्या केली होती. आणि आरोपी प्रीतराम धकाते हा ट्रान्सपोर्टचा ट्रकने गावावरून पंधरा दिवसापासून फरार झाला होता .पोलीस ठाण्याला तक्रार प्राप्त होताच 
 पोलिसांनी प्रितराममला शोधण्यासाठी आपले तपास चक्र चालू केले होते. मात्र आरोपी प्रीतराम पोलिसांना चकमा देत होता पोलीस विभागाला गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी प्रीतराम हा उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे सादूच्या वेशभूषा परिधान करून राहत असल्याची खबर पोलीस विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन कोरची येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर यांनी स्वतः सोबत कोरची पोलीस स्टेशन येथील तीन पोलीस कर्मचारी घेऊन प्रीतरामला शोधण्याकरिता मथुरा गाठले. प्रीतरामला आपली खबर लागू नये म्हणून पोलीस निरीक्षक फुलकवर यांनी आपण स्वतः साधूचा वेश परिधान करून बाकी पोलीस यांना रिक्षा चालकाचे व चने विक्रीचा धंदा लावण्याचे सांगितले आणि आरोपीप्रीतरामला पकडण्याकरिता सापडा रचला प्रीतराम याला पाच दिवसाच्या शोध मोहीम राबवून अखेर पोलीस विभागाला पकडण्यात यश आले .पोलीस निरीक्षक फुलकवर यांनी चातुर्य बुद्धी व कला कौशल्य आत्मसात करून आणि धाडसी जिगर दाखवून कोचिनारा येथील आरोपी प्रीतराम धकाते या मारेकऱ्याला बाहेर राज्यांमध्ये जाऊन आपल्या पोलिस सहकाऱ्याच्या मदतीने पकडून आणल्याने पोलीस विभागात तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशस्वी कामगिरी मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवार पोलीस कर्मचारी तेजराम मेश्राम ,नरेंद्र धोंडने, शिवचरण भालेराव आदींनी यशस्वी भूमिका बजावली आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीच्या विरोधात कलम 302 ,325 ,506 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !