राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती

0
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) गडचिरोली जिल्हाध्यक्ष  पदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती


अशोक खंडारे मुख्य संपादक 

 गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्षपदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँगेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अतुल गण्यारपवार यांना जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिले.

राष्ट्रवादी काँगेसमध्ये अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे फूट पडली. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम हे अजितदादाच्या सोबतीला गेले. त्यांना मंत्रिपदही मिळाले. त्याचबरोबर गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर हेही अजित पवार गटात सामील झाले. त्यामुळे एकेकाळी राष्ट्रवादित धर्मरावबाबा आत्राम यांचे जवळचे सहकारी असलेले माजी जिल्हापरिषद सदस्य व चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अतुल गण्यारपवार यांना शरद पवार गटाकडून मुंबईच्या बैठकीसाठी बोलावणे आले त्याच वेळी त्यांच्याकडे मोठी जिल्ह्याची मोठी जबाबदारी देणार हे स्पष्ट झाले होते. जिल्हयात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना शह देण्यासाठी पक्षसंघटनबांधणीचा दांडगा अनुभव असलेले अतुल गण्यारपवार यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली गेली. विदर्भात पक्षाची नव्याने उभारणी करण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. ते 9 जुलै रोजी गडचिरोलीत येऊन राष्ट्रवादिच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी अतुल गण्यारपवार यांनी या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळली होती. अतुल गण्यारपवार यांनी काँग्रेस मध्ये एन एस यु. आय, व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषविले होते. तसेच ते जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आले, त्यांनी जिल्हा परीषदेत कृषी सभापती म्हणुन काम पहिले. ते चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहे.

अतुल गण्यारपवार राष्ट्रवादी यांच्यासमोर राष्ट्र वादी काँग्रेसच्या पक्षबांधणीचे मोठे आव्हान आहे. अतुल गण्यारपवार यांच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त केल्याने राष्ट्रवादी काँगेस अजित पवार गटाला अहेरी विधानसभा क्षेत्रात फार मोठे आव्हान नसले तरी लोकसभेची निवडणुक लढविण्यासाठी बाशिंग बांधून असलेले मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी ते अडसर ठरू शकतात. अतुल गण्यारपवार यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील जनतेनेंनी त्यांचे अभिनंदन केले आहे 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !