सामाजिक दायित्व जोपासत एका व्यापाऱ्याने दिले विघार्थ्यांना नोटबुक व पेन
क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी:-
सामाजिक दायित्व जोपासत एका व्यापाऱ्याने दिले विघार्थ्यांना नोटबुक व पेन हे व्यापारी गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील लगाम या गावचे असून प्रतिष्ठीत नागरीक सुद्धा आहेत
या व्यवसायीकाचे नाव नंदुभाऊ पोलशेट्टीवार असे असून यांनी समाजाप्रती आपले दायित्व लक्षात घेऊन लगाम येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील २५ विद्यार्थ्यां करीता वर्ग निहाय लागणारे नोटबुक व पेन वितरीत करून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावले आहे. त्यांच्या या कार्याने परीसरातील जनतेसमोर एक आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या या कार्याची परिसरात स्तुती होत आहे त्यांच्या या कार्यात त्यांचे बंधू सुधीर पोलशेट्टीवार यांनी सुध्दा सहकार्य केलेले आहेत, शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वितरीत करतांना शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक, विद्यार्थी व इतर प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते

