जातीवादी समाजकंटकांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या, या करीता नागभीड येथे जन आक्रोश मोर्चा
अरुण रामुजी भोले /
नागभिड तालुका प्रतिनिधी
वैनगंगा वार्ता १९
नागभीड :-
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून नांदेड जिल्हातील बोंढार (हवेली) गावातील भीमसैनिक अक्षय भालेवार या तरुणाची जातीवाध्यांनी निर्घूण हत्या केली, तसेच अक्षय भालेवार यांच्या आई ,वडील व भावास बेदम मारहाण करुण त्यांच्या घरावर दगडफेक केली पुरोगामी महाराष्ट्रात अल्पसंख्यांक, अनु. जाती/ जमाती यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या घटना सतत घडतच आहेत . तर दुसरी घटना दक्षिण मुंबईमधील चरणी रोड भागात असलेल्या सावित्रीबाई फुले वसतीगृहात हिना मेश्राम या विद्यार्थिनीचा बलात्कार करून खुन करण्यात आला.
या दोन्ही घटनेचा निषेध करण्याठी व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी या मागणीसाठी बौद्ध समाज नागभीड तालुक्याच्या वतीने दिनांक ३/७/२०२३ रोज सोमवारला ठीक ११ वाजता आनंद बुद्ध विहार नागभीड येथून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात नागभीड तालुक्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. मोर्च्या मध्ये अक्षय भालेराव अमर रहे, अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषनांनी नागभीड शहर दणाणून गेले. मोर्चा अतीशय शीस्तपणे जात होता. समता सैनिक दल लोनखैरी यांनी मोलाची कामगीरी केली.मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहचताच मोर्चाचे रुंपातर सभे मध्ये झाले. यावेळी मोर्चाला मान्यवरांनी संबोधीत केले. यामध्ये प्रा.डाँ. अनमोल शेंडे, शाम रामटेके ,अँड. आनंद घुटके , अँड.शर्मीला रामटेके , डाँ. मनोहर टेंभुरकर, मनोहर रामटेके, आश्विन मेश्राम , अमृत शेंडे , वृषभ खापर्डे .चंदन कोसे यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
जातीवादी समाज कंटकांना धडा शिकविन्यासाठी ,अक्षय भालेराव व हिणा मेश्राम यांच्या परीवाराला न्याय मिळवुन देण्यासाठी सर्व बौद्ध बांधव मोठ्या संख्येत या मोर्च्यात सामील झाले होते.

