आष्टी पोलीस स्टेशनच्या स्पर्धा परीक्षेच्या सराव पेपरला विघार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
 आष्टी पोलीस स्टेशनच्या स्पर्धा परीक्षेच्या सराव पेपरला विघार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


अशोक खंडारे/मुख्य संपादक

आष्टी:-
 गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत यशोरथ टेस्ट सिरीज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्रमांक - 01 चे मा. पोलीस अधीक्षक निलोत्पल , अप्पर पोलीस अधीक्षक तारे , अप्पर पोलीस अधीक्षक चिंता ,अप्पर पोलीस अधीक्षक देशमुख,
उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड एटापल्ली यांच्या मार्गदर्शनातून पोलीस स्टेशन आष्टी अंतर्गत येथील ग्रामपंचायत चे सार्वजनिक वाचनालय येथे स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक-01 सकाळी 11 वा. पासून ते 13/00 वा. पर्यंत घेण्यात आले. सदर परीक्षेकरिता पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील ऐकून 85 विद्यार्थी परीक्षेकरिता उपस्थित होते. सराव परीक्षा झाल्यानंतर लागलीच प्रथम तीन क्रमांक काढून त्यांना पोलीस स्टेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट म्हणुन देण्यात आली. 
सदर परीक्षा संपताच, पोलीस स्टेशन आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी वाचनालयातील विद्यार्थी तसेच परीक्षेकरिता आलेले विद्यार्थी यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम घेवून मोलाचं मार्गदर्शन केले
 सदर कार्यक्रमाकरिता आष्टी ग्रामपंचायत चे सरपंच सौ बेबीताई बुरांडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या, सदर कार्यक्रम दरम्यान पोलीस स्टेशन आष्टी यांच्या माध्यमातून मौजा आष्टीच्या ग्रामपंचायत सार्वजनिक वाचनालया करिता स्पर्धा परीक्षेचे पुस्तक संच ( जवळपास 10, 000/- रूपयांची) भेट म्हणुन देण्यात आले.
    स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट मिळाल्याने स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाचे तसेच आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !