ट्रॅव्हल्सला अपघातामध्ये 40 ते 45 प्रवासी जखमी

0
 ट्रॅव्हल्सला अपघातामध्ये 40 ते 45 प्रवासी जखमी



गडचिरोली:-
चंद्रपूर गडचिरोली महामार्गाने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स खाजगी बसला मुल शहरा नजीक अपघात झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर गडचिरोली महामार्गाने भरधाव वेगाने खाजगी बस चालली होती. मात्र 15 जुलैला रात्रीच्या सुमारास मुल शहरां जवळील एमआयडीसी परिसरातील चंद्रपूर गडचिरोली मुख्य मार्गावर खाजगी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला बस पलटी झाल्याने बसला अपघात होऊन बसमधील 40 ते 45 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. छत्तीसगड वरून प्रवासी हैदराबाद कडे घेऊन जाणारी खाजगी बस क्रमांक br ०१.५६५५ ही बस चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर मूल शहरां जवळ एमआयडीसी परिसरा जवळील चंद्रपूर गडचिरोली मुख्य मार्गावर बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी झाल्याने बसमधील ४० ते ४५ जखमी झालेल्या प्रवाशांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मुल येथे नेण्यात आल्याची माहिती आहे घटनास्थळावर पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !