अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभीड -:
चंद्रपुर जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या नागभीड तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीवर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि नागभिड नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागाचा सर्वागीण आणि व्यापक विकास घडून यावा या हेतूने आणि विशेषत, समाजातील अविकसित स्तराच्या विकासावर भर देण्याच्या दृष्टीने शासनाने सामाजिक व आर्थिक विकासाचे अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. या कार्यक्रमाचे यश हे सर्वस्वी ते कशा पध्दतीने कार्यान्वीत केले जातात आणि या कार्यक्रमाशी संलग्ल असलेले स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक पुढाकार यांचेवर अवलबून असते हे लक्षात घेवून शासनाने तालुका पातळीवर संदर्भिय निर्णयानुसार एकात्मिक विकासासाठी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार नागभीड तालुका स्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीवर संतोष पिसे, ईश्वर चंद्रभान मेश्राम, जिवेश महादेव सयाम, दशरथ रामचंद्र उके, विनोद हरिभाऊ हजारे, गोपाल किसन खामदेवे, सौ, पद्माताई भास्करराव कामडी, कु.उज्वला श्रीराम माटे यांची सदस्य निवड करण्यात आली आहे.

