स्वतःच्या घरात घेतला तरुणाने गळफास

0
 स्वतःच्या घरात घेतला तरुणाने गळफास
..



प्रविण तिवाडे/कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता 

गडचिरोली :-
जिकडे तिकडे पावसाळा सुरू असल्याने शेतीचे कामे जोरात सुरू आहेत आणि शेताची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागातीलगाव हे दुपारच्या सुमारास ओस असतात अशातच दुपारच्या सुमारास घरी कोणीच नसल्याचे पाहून एका तरुणाने स्वताच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली तालुक्यातील  चांभार्डा येथील मिथुन काशिनाथ बावणे वय 27 वर्षे हा युवक आपल्या राहत्या घरामध्ये 27 जुलै रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. स्वतःच्या शेतात रोवणीचे काम सुरू असल्याने मिथुन आणि त्याचे वडील हे दोघेही जन 27 जुलै रोजी शेतावर गेले होते  दुपारच्या सुमारास तो घरी आला होता मात्र दुपारच्या वेळामध्ये मिथुन हा बराच वेळ होवूनही  शेतावरती परतला नाही यामुळे वडिलांना वाटले की एवढा वेळ •होऊन सुद्धा मुलगा शेतावरती आला नाही म्हणून वडील घराकडे आले असता त्यांना मिथुन गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये घरात दिसला लागलीच त्यांनी आजूबाजूला ओरड करून याची माहिती लोकांना दिली लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून युवकांचे प्रेत ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनाकरिता मृतदेह पाठवीले घरातील तरुण  मूलगा गडफास घेऊन मृत पावल्याने वडीलावरती मोठे संकट निर्माण झाले आहे. मात्र युवकाने ऐकाऐकी गळफास कशामुळे घेतला असेल याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !