युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज - गटविकास अधिकारी पाटील
अशोक खंडारे मुख्य संपादक
कुरखेडा:-
आजच्या काळात मोठ्या प्रमाणात महिलांवर व युवतीवर क्रूर हिंसाचार च्या घटना घडत असून त्यातून त्यांची हत्यासुद्धा केली जात आहे. मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांकडून युतीवर व महिलांवर होणारे हल्ले रोखण्याकरिता राजमाता जिजाऊ स्वरक्षन प्रशिक्षण देणे ही काळाची गरज असून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक युवती हे स्वसंरक्षण करू शकतील असा आशावाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धिरज पाटील यांनी केले.
ते महिला व बाल विकास विभाग तथा बाल विकास प्रकल्प कार्यालय कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुरखेडा येथील स्वर्गीय गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय कुरखेडा येथे आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सहउद्घाटक म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे तर मुख्य मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक भावना भिंगारदेवे तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी शिवणकर, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी माया बाळराजे , प्राध्यापक विनोद नागपूरकर तर मुख्य प्रशिक्षक म्हणून मुरकुटे उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक भिंगारदे व बाळराजे यांनी युवतींनी स्वसंरक्षणासोबत स्वतःची जबाबदारी ओळखून आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये कसल्याही प्रकारची न्यूनगंड न बाळगता घडलेल्या घटनेच्या संदर्भात आपल्या आई-वडिलांना माहिती देने.
यावेळी तालुक्यातील विवीध हायस्कूल व उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ स्व संरक्षणाचे प्रशिक्षणाचे धडे मुरकुटे यांनी विविध प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून करून दाखवले व यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संकटाच्या वेळी स्वतःचा बचाव कशा पद्धतीने करता येईल याकरिता या प्रशिक्षणाच्या माध्यमातून धडे घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कार्यक्रम संयोजक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांनी केले तर संचालनसंरक्षक अधिकारि नेवारे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षक व तालुक्यातील युवती उपस्थित होते.

