चेक बोरगाव येथील घटना
प्रविण तिवाडे/कार्यकारी संपादक
गोंडपिपरी :-
तालूक्यातील चेक बोरगाव येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ
जनक घटना घडली आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव बाबाराव धोंडूजी मालेकर रा.चेक बोरगाव वय अंदाजे ६५ वर्ष असे आहे.
प्राप्त माहितीनुसार मालेकर हे आज सकाळपासूनच अस्वस्थ
होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेत पिकांची पाहणी करण्यासाठी म्हणून बोरगाव मार्गावर असलेल्या शेतात दुचाकी घेऊन गेले. गोंडपिपरी बोरगाव मार्गापासून काही अंतरावर
असलेल्या साळवे यांच्या शेतातील
आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.दरम्यान घटनास्थळी देशी दारूची खाली बॉटल, आणि पाणी आढळून आल्याने त्यांनी गळ फास घेण्या अगोदर मद्य प्राशन केल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीसांना देण्यात आली असता पोलीस घटना स्थळी दाखल झाले. मृतकाचा मृतदेह उतरवून पंचनामा करून उत्तरनिय तपासनीसाठी गोंडपिपरी येथील
ग्रामीण रुग्णालयात पाठविन्यात आले. मालेकर यांनी नेमकं आत्महत्या का केली याचे कारण अध्याप कळू शकले नाही.मात्र त्याच्याकडे भरपूर शेती होती. शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते.
कर्जापाई गळफास घेऊन आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा
सुरू असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.
मालेकर यांच्या पश्चातच पत्नी, मुले, नातवंड असा मोठा आप्तपरिवार असून त्याच्या म्रुत्युने गावात हळहळ व्यक्त जात आहे.