BIG BREAKING: भरधाव वेगातील कंटेनर थेट घुसला हॉटेलमध्ये अन् १२ जनांचा घेतला जीव

0
BIG BREAKING: 
 भरधाव वेगातील कंटेनर थेट घुसला हॉटेलमध्ये अन् १२ जनांचा घेतला जीव 



धुळे:- वैनगंगा वार्ता १९

मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे थेट एका हॉटेलमध्ये घुसून तब्बल १२ जणांचा जीव घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. 
शिरपूर येथील पळसनेरमध्ये मध्यप्रदेशच्या सीमेनजीक ही घटना घडली आहे. या अपघातात १५ ते २० जण गंभीर जखमी असल्याचेही समोर येत आहे.

याबाबत माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरून एक कंटेनर जात होता. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळसनेर येथील मध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ आल्यानंतर ब्रेक फेल झाल्यामुळे हा कंटेनर थेट एका हॉटेलमध्ये घुसला. त्यामध्ये अनेकजण चिरडले गेले. या घटनेत तब्बल १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून जवळपास १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !