वैनगंगा नदी पात्रातून गाई बैलांची तस्करी, बैल बाजार कसायाचे माहेरघर

0
 वैनगंगा नदी पात्रातून गाई बैलांची तस्करी,  बैल बाजार कसायाचे माहेरघर 



प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

पोंभुर्णाः-
 तालुक्यातील घोसरी आणि घाटकुळ येथे मोठा बैल बाजार भरतो. या बैल बाजार मध्ये गडचिरोली जिल्ह्यातून जुनगाव- लखमापूर बोरी येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून आडमार्गाने गाई बैलांची तस्करी सुरू आहे. घाटकुळ आणि घोसरी येथील बैल बाजारात खाटकी मोठ्या प्रमाणात उतरत असून सकाळी दहा वाजता पासून जनावरांची रवानगी कत्तल खाण्याच्या दिशेने केली जाते. राजरोसपणे हा गोरख धंदा चालू असला तरी याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने अनेक जनावरांना कत्तलखान्यात आपला जीव द्यावा लागत आहे. संबंधित विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन बाजारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अनेक जनावरांचे जीव वाचवावे अशी मागणी शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !