विज दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा - जय विदर्भ पक्षाची मागणी

0
विज दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा - जय विदर्भ पक्षाची मागणी



अशोक खंडारे मुख्य संपादक

गडचिरोली:-
विज दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव कमी करा अशी मागणी जय विदर्भ पक्षाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे 
वीज दरवाढीचा जय विदर्भ पक्षा कडून निषेध करण्यात येत आहे 
वीज महामंडळ आणि राज्य सरकारने १ एप्रिल २०२३ पासून वीजेचे दर भरमसाठ वाढविल्या मुळे महागाईत भरडलेल्या जनतेला हे सरकार खरोखरच जनतेच्या हिताचे आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे ? जनतेचे सरकार असे मुख्यमंत्री वारंवार बोलतात याचा जनतेला विचार करण्याची वेळ आली आहे. मार्च २०२३ आणि एप्रिल २०२३ च्या वीज बीलाची तुलना केल्यास घरगुती वापरायची वीजबील १०० युनिट करिता १२१ रुपये तर२०० युनिट करिता ३९२ रुपये वाढून आलेले आहे. ३२ रुपयाचे पेट्रोल १०० रुपयाच्या पलीकडे , डिझेल १०० रुपया पर्यंत , गॅस सिलेंडर ११५९ रुपये तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या किमंती सुद्धा भरमसाठ वाढल्या असल्यामुळे सर्व सामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. १ एप्रिल २०२३ पासून वाढलेल्या वीज दराचे जय विदर्भ पार्टी निषेध करून हि दरवाढ शासनाने मागे घ्यावी असे आवाहन करीत आहे. अन्यथा जय विदर्भ पार्टी कडून विज दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा जय विदर्भ पार्टीचे संस्थापक सदस्य तथा जिल्हा प्रभारी अरुण पाटील मुनघाटे , जिल्हाध्यक्ष नसीर जुम्मन शेख . उपाध्यक्ष रमेश उप्पलवार , ग्यानचंद सहारे, घासु पाटील खुणे यांनी एका पत्रकातून दिले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !