नरेगा कामावरील मजुरांवर मधमाशांचा हल्ला 10 मजुर जखमी
अशोक खंडारे मुख्य संपादक
जोगीसाखरा:-
आरमोरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत जोगीसाखरा - हि मजुरांना जवळपास हिवाळा ते पाऊस पडे पर्यंत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देत असल्यामुळे सालमारा येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतुन नाला खोलीकरणाचे काम २२५ मजुर करीत असताना आज सकाळी नव वाजताच्या सुमारास झाडावर बसलेल्या मधमाशांनी मजुरांवर हल्ला करून जवळपास 10 मजुरांना जखमी केले
परंतु यातील लिलाधर कांबळी भाग्यवान धनकर राहुल वाघ चद्रभान भैसारे अल्का कन्नाके यांना जास्त जखमी केल्याची माहिती मजुरांनी जोगीसाखरा ग्रामपंचायत चे सरपंच संदिप ठाकुर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांना दिली असता कसलाही विलंब न करता घटनास्थळ गाठूण साधारण ४ जखमींना जोगीसाखरा प्राथमिक आरोग्य पथकात उपचारासाठी आणले असता डॉ शालिनी हस्तीमारे व आरोग्य सेविका चिलबुले यांनी उपचार केले आति जखमी लिलाधर कांबळी यांना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
यावेळी सरपंच संदिप ठाकुर सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम डॉ शालिनी हस्तीमारे आरोग्य सेविका चिलबुले ग्रा.प. परीचर मधुकर मानकर रोजगार सेवक राजेंद्र सोरते पंढरी मांढरे गंगाधर कुमरे उपस्थित होते.