अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
अंध विद्यार्थ्यांना लिटील हार्ट इंग्लिश मिडीयम स्कूल आष्टी कडून मदतीचा हात देण्यात आला. नॅशनल असोशिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र द्वारा दृष्टी बाधितांसाठी राबविण्यात आलेल्या संस्थेला लिटील हार्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकूण १२०८४/- रुपये रक्कम जमा करून अंध विद्यार्थ्यांना मदत केली. सदर रोख रक्कम आष्टी केंद्राच्या केंद्रप्रमुखाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सचिव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.